बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?- प्रविण दरेकर

मुंबई | संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने ओबीसी आरक्षणासाठी छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर टीका केली. याला भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संघर्ष कधी करावा, संवादाने प्रश्न सुटतील असे मुख्यमंत्री सांगत असताना, आपण संवाद करत आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही?, असा सवालही प्रविण दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आहे. संघर्षातून न्याय मिळविणे हा शिवसेना पक्षाचा इतिहास आहे. मात्र आज संघर्ष नको असं शिवसेना सांगत आहे. शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याकारणामुळे आज केवळ सत्ता टिकवणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी खोचक टीका प्रविण दरेकरांनी केली.

भाजपने काल संपूर्ण राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष उभा केला, आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला आदळआपट म्हणणं म्हणजे आंदोलकांची किंबहुना ज्या समाजाच्या न्यायहक्कांसाठी भाजपकडून संघर्ष करण्यात आला. त्यांचा अपमान करण्यासारखी किंवा चेष्टा करण्यासारखी गोष्ट आहे. OBC व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे आदळआपट असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखं आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका, त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते”

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार

‘दोन्ही डोस घेतलेत म्हणून निर्धास्त राहू नका, कारण…’; डेल्टा व्हेरिएंटबाबत WHO ने दिली महत्वाची माहिती

पुण्यात गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More