बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लॉकडाऊन नको असेल तर…’, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

मुंबई | कोरोनाच्या नव्या विषाणूला (New Corona Varient) थोपवण्यासाठी प्रशासनासह सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोरोना आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये विषाणूला रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) या बैठकीला उपस्थित होते. ओमिक्राॅन विषाणु (Omikron Varient) हा सध्या जगभराच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणुला थोपवायचं असेल आणि लाॅकडाऊन (Lockdown) नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील, असं आवाहन जनतेला केलं आहे.

केंद्र सरकारच्या सुचनांची वाट न पाहता या विषाणुला रोखण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करा, अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. कारण नुकत्याच डोंबिवलीतील एका तरूणाला दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे. (Dombivali boy corona Positive)

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन या व्हेरिएंटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसेच या विषाणुमुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देशात येण्यास बंदी घातली आहे. तर काहींनी ठराविक देशातील प्रवाशांवर बंधनं घातली आहेत. आता येणाऱ्या काळात लाॅकडाऊन (Lockdown) होणार की नाही, असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. तसेच यामुळे सर्वजण चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

‘कुछ नही होता यार’ आता अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची घंटा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी जाणून घ्या एका क्लिकवर

“वीज कनेक्शन तोडले, गावची गावे अंधारात जात आहेत आणि तुम्ही लग्नात नाचता?”

“…पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही, 2 वर्षात राज्य 20 वर्षे मागे गेलं”

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसावा म्हणून चक्क धरणातून सोडले पाणी, अधिकाऱ्यांचा प्रताप उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More