बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घशात दुखत असेल तर करा ‘हे’ नैसर्गिक उपाय, मिळेल त्वरित आराम

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना साथीने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या अनेक लक्षणांपैकी घशात दुखणे हे एक लक्षण आहे. अन्य काही कारणांमुळे देखील घशाला त्रास जाणवू शकतो. संसर्ग काळामध्ये घशाची काळजी घेणे आवश्यक आहे. घशात काही संसर्ग असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही औषधे घेवू शकतात.

अनेकवेळा नैसर्गिक उपचाराने देखील उपचार घेता येतात आणि इतर उपचारांपेक्षा लवकर आराम देखील मिळू शकतो. घशात जर काही त्रास होत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून शकता. घशात दुखत असेल तर तळलेले पदार्थ खाणे टाळा. तळलेले पदार्थ खाल्ल्याने घसा खवखवण्याचा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो.

फ्रिजमधील थंड पाणी पिणे हे देखील हानिकारक ठरू शकते. त्यामुळे फ्रिजमधील पाणी पिणे टाळालयला हवे. आयुर्वेदानुसार ही पेये कफ वाढवण्याचे कारण ठरू शकते. तसेच आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांचे सेवन देखील टाळावे. हळदीचे दूध प्यायल्यास देखील फायदा होतो.

दरम्यान, गरम पाणी आणि मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास देखील घशातील कफ दूर होऊ शकतो. तुळशीच्या पाने देखील आयुर्वेदीक आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टीक गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांचा चहा पिल्यास घशाचा त्रास दूर होण्यास मदत होते.

थोडक्यात बातम्या- 

अभिमानास्पद! इस्राएलमधील रस्त्याला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

धक्कादायक! रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरल्यावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, डाॅक्टर म्हणाले…

प्रियंका गांधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, “वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी…”

…म्हणून सलमान आणि शेहनाजला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More