बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्ट ऑफिसमध्ये ‘हे’ खातं असेल तर मिळेल 2 लाखांचा फायदा!

नवी दिल्ली | भारतीय डाक विभाग ग्राहकांसाठी आकर्षक योजना घेऊन येतं. पोस्ट ऑफिसच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पैसे गुंतवण्यापासून ते ठेवींचं संरक्षण करण्यापर्यंत पोस्ट ऑफिस ग्राहकांना त्यांच्या सोईच्या योजना पुरवत आहे. जन-धन खात्यांबाबत पोस्ट ऑफिसने मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान जन-धन योजनेत देशातील नागरिकांचं खातं उघडण्यात आलं आहे. या खात्यांच्या माध्यमातून देशातील नागरिकांना सुविधा पुरवण्याचा सरकारचा मानस असतो. पोस्ट ऑफिस जन-धन खाते असणाऱ्या ग्राहकांना योजनांचा लाभ मिळवून देत आहे. ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांना थेट 2 लाख रूपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.

ग्राहक त्यांचं जुनं खातं सुद्धा जन-धन खात्यात वर्ग करू शकतात. केंद्र सरकार योजनांच्या माध्यमातून थेट या खात्यावर रक्कम टाकत आहे. 6 महिन्यानंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना अपघाती वीमा संरक्षण सुद्धा मिळतं. हे विमा संरक्षण तब्बल 2 लाख रूपयांपर्यंत आहे. देशातील नागरिकांना झीरो बॅलन्सवर जन-धन खातं उघडण्याची सुरूवात केंद्र सरकारने केल्याने याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला आहे.

जन-धन खाते धारकांना रू-पे कार्ड दिलं जातं. या कार्डच्या माध्यमातून आपण खरेदी करू शकतो. तसेच मोफत मोबाईल बॅंकींग सुविधा सुद्धा ग्राहकांना पोस्ट ऑफिस देत आहे. 30 हजार रूपयांपर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. याचा फायदा लाभार्थ्याला होणार आहे.

थोडक्यात बातम्या 

आधी संघ-भाजपला विरोध, आता युती!; पुरुषोत्तम खेडेकरांनी सांगितलं खरं कारण

“कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”

बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक कारण आलं समोर

राज कुंद्रा प्रकरणात मोठी अपडेट; आता शिल्पा शेट्टी बनणार साक्षीदार

एयरोस्पेस कंपनीनं 9 वर्षांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच सामान्य नागरिक झेपावले अंतराळात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More