बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच’; इम्तियाज जलील यांचं थेट आव्हान

औरंगाबाद | गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरचा विषय राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केला होता. अनेक पक्ष संभाजीनगर नामांतर करण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. मात्र, आता एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर नावावरून शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

हिंमत असेल तर शहराची नावे बदलून दाखवाचं, असं आव्हान इम्तियाज जलील यांनी केलं आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून इम्तियाज जलील यांनी ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं आहे त्या अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेकडून औरंगाबाद नामांतरावर आग्रही भूमिका मांडण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवला होता. त्यानंतर मात्र नामांतराचा विषय मागे पडला. त्यातच आता पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीवरून नामांतराचा मुद्दा जास्त प्रकाशझोतात येत आहे. आता एका सरकारी परिपत्रकात संभाजीनगर असा उल्लेख केला गेला. यावरून इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडूनही संभाजीनगर असं नामांतर करण्यात यावं, अशी भूमिका मांडली जात आहे. आता या वादावरून राजकीय पक्ष भविष्यात काय पवित्रा घेणार आहेत, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

“आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरूष, बाबरी तोडली तेव्हा काखा वर करून पळालो नाही”

‘…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले’; पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

“महाराष्ट्र तुळशीचे वृंदावन आहे, इथं गांज्या आणि भांग पिकवू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More