बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या सध्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलेच चर्चेत आले आहेत. किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात आणि त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारनं त्यांचे दौरे रोखू नयेत असं मला वाटतं, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अशातच आता संजय राऊतांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सोमय्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहोचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखत ताब्यात घेतलं. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलंय.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवारानं सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक हालचाली पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“संज्या ते पवार कुटुंब आहे, शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील”

“हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात मग सोनिया गांधी पंतप्रधान का बनू शकत नाहीत?”

भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा आमसभेत भाषण देतोय- नरेंद्र मोदी

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More