बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

10 सेकंद वाट पाहावी लागली तर आजपासून अजिबात टोल भरु नका!

नवी दिल्ली | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. हायवेवर प्रवास सुलभ करण्यासाठी सरकारने फेब्रुवारी 2021 पासून फास्टॅग सिस्टम अनिवार्य केली आहे. मात्र आता सरकारने टोल प्लाझावर टोल टॅक्स वसूल करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियम बनवला आहे.

जर टोल प्लाझावर तुमच्या वाहनाला 100 मीटरहून अधिक लांब ट्रॅफिक लागलं किंवा तुम्हाला टोल पेमेंट करताना 10 सेकंदहून अधिक वेळ वाट पाहावी लागली, तर तुमच्याकडून, तुमच्या वाहनासाठी टोल टॅक्स वसूल केला जाणार नसल्याचं कळतंय. लांब ट्रॅफिक लागलं किंवा तुम्हाला टोल पेमेंट करताना 10 सेकंदहून अधिक वेळ वाट पाहावी लागली, तर तुमच्यासाठी टोल टॅक्स मोफत केला जाईल.

जर गाड्यांची लाईन, टोल कलेक्शन पॉईंटवर आखलेल्या पिवळ्या लाईनच्या पुढे गेल्यास, वाहन चालकांकडून टोल टॅक्स घेतला जाणार नाही, असे आदेश टोल वसूल करणाऱ्यांना दिले जाणार आहेत.

टोल प्लाझावर गाड्यांच्या लांब रांगांमुळे ट्रॅफिकची परिस्थिती निर्माण होऊ नये, प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी सरकारने हा नियम केला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

2 कोटी रुपये जिंकण्याची संधी, ‘या’ सरकारी कंपनीची जबरदस्त ॲाफर

कोरोना व्हायरस कुठून आला?, शास्त्रज्ञांना सापडला मोठा पुरावा

क्लार्कच्या घरावर पडला छापा, संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

कोरोनामुळे आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षणासह केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा!

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More