Top News राजकारण

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणवीसांचा सरकारला इशारा

मुंबई | आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केलीये.

भाजप ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हे मिळायलाच पाहिजे आणि याबाबत कोणतंही दुमत नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही.”

दरम्यान, जर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा. आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.

ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करतात. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात, असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.

थोडक्यात बातम्या-

‘ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही’ म्हणत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विजय मल्ल्या कंगाल; वकिलाची फी देण्यासाठीही नाहीत पैसे!

उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

मुंबई ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम; विदर्भ, कोकणाला पावसाचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या