बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’; किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेते किरण माने हे चांगलेच चर्चेत आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो, या मालिकेत आघाडीची भूमिका किरण माने यांनी साकारली होती. परंतू, किरण माने यांना मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आलं. त्यानंतर किरण माने यांनी अनेक आरोप केले होते. त्यातच आता किरण माने यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे करणार असल्याचं सांगितलं आहे.

एका राजकीय पोस्टमुळे काढून टाकण्यात आले, असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यातच एक राजकीय नेता त्रास देत असल्याचा उल्लेखही किरण माने यांनी एका पोस्टमधून केला आहे. काही दिवसांपूर्वीच किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. किरण माने यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं.

प्रेस कॉन्फरन्स घेतोय उद्या …लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत, असं त्यांनी एका फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा तुम्हाला न सांगता गुपचूप कटकारस्थान करून तुम्हाला कामावरनं काढायची छाती नाही झाली पाहिजे कोणाची, असंही किरण मानेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, किरण माने उद्या पत्रकार परिषद घेत काय खुलासे करणार? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. मान वर केली, आवाज उठवला, बंड उठवला तर ए.. तुझा किरण माने करेन असं सुनावलं जाईल. परंतु, या लोकांनी चुकीचा माणूस निवडला आहे, असं किरण माने यांनी म्हटलं आहे. किरण माने यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये ही पोस्ट लिहिली  आहे.

थोडक्यात बातम्या- 

भिडे पूल होणार इतिहासजमा, पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

महेश मांजरेकर यांनी लेकीच्या अभिनयाविषयी सांगितली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

बाॅलिवूडला मोठा धक्का! सदाबहार अभिनेते रमेश देव यांचं निधन

स्मार्टफोनमध्ये डॉक्युमेंटवर डिजिटल स्वाक्षरी कशी कराल?; वाचा संपूर्ण प्रकिया

Breaking| 10 वी 12 वीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More