बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातुन मध्यप्रदेशात प्रवास करताय तर, कोरोनासंदर्भातील ‘हे’ नवे नियम पाळणं बंधनकारक!

भोपाळ | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शेजारील राज्य मध्यप्रदेशने महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तींना एका आठवड्याचे विलगीकरण बंधनकारक केले आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या लोकांना आठवडाभर विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे अशा मार्गदर्शक सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या सीमेजवळील जिल्ह्यांना महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची माहिती देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मध्यप्रदेशात सध्या 4 हजार 740 एवढे सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा वाढू नये यासाठी सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मध्यप्रदेश सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार, महाराष्ट्राच्या सीमेजवळील जिल्ह्यांमध्ये सभागृहात उपस्थित राहण्याची क्षमता 50 टक्केच करण्यात आली आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोरपणे करण्यात यावं असा आदेशही देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 27 हजार 480 सक्रिय रुग्ण असून काल एकाच दिवसात 16 हजार 620 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने शेजारील राज्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून देशावर घोंगावत असलेलं कोरोनाचं संकट अजूनही कमी होताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे आता पुन्हा लाॅकडाउन होणार का? याची भीती सर्वसामान्यांना सतावत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; नवनीत राणांचं अमित शहांना पत्र

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

राज्याचे गृहमंंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार? जयंत पाटील म्हणाले…

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More