पुणे | शेअर मार्केटमधे गुंतवणूक करताना अनेकांना वेगवेगळे प्रश्न असतात. यातील तांत्रिक बाबी जरी माहित असल्या तरीही यातील सायकॉलॉजी अर्थात मानसिकतेत अनेकजण मागे पडतात व अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात. शेअर मार्केटमधे वावरताना सायकॉलॉजीला जर महत्त्व दिले तर यश मिळण्याची संधी नक्कीच वाढते. हाच क्लिष्ट विषय हातात घेऊन पैसापाणीने प्रविण पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली यावर उत्तरं शोधण्यासाठी या वर्कशॉपचे आयोजन केले होते.
पैसापाणी हे कॅस मीडिया प्रायव्हेट लिमीटेड या पालक संस्थेचे अपत्य आहे. आम्ही हे संपुर्ण वर्कशॉप मराठीत आयोजीत करत आहोत. जेणेकरुन मराठी माणसाला शेअर मार्केटशी संबंधीत टेक्नीकल गोष्टी व मानसिकतेची माहिती होईल. यापुर्वीही आम्ही वर्कशॉप घेतली असून शेअर मार्केटमधील तांत्रिक बाबी व मानसिकता यांचं एकत्रित मार्गदर्शन देणारं हे पहिलंच वर्कशॉप आहे, असं कॅस मीडियाचे सीईओ व सहसंस्थापक चिन्मय रेमणे या वर्कशॉपबद्दल बोलताना म्हणाले.
शेअर मार्केटमधे सेल्फ डिसीप्लिन अर्थात स्वयंशिस्त किती महत्त्वाची आहे? यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? कुठल्या स्ट्रॅटेजी वापरल्या पाहिजेत? कोणते फंडे वापरले पाहिजेत? हे सहभागींना प्रविण पाटील यांच्याकडून या निमित्ताने शिकायला मिळालं. मला पैसापाणीच्या माध्यमातून या क्षेत्राबद्दल लोकांमधे जागृती करताना नक्कीच आनंद होत आहे. अशा मोठ्या माध्यमातून सहभागी व नव्याने या क्षेत्रात दाखल होत असलेल्या सर्वांनाच या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल, असं फुल टाईम ट्रेडर असलेले प्रविण पाटील म्हणाले.
दरम्यान, पैसापाणी ही मराठी भाषेत शेअर मार्केटसंबंधीत काम करणारी पुणेस्थित संस्था आहे. या संस्थेने गेल्या काही काळात शेअर मार्केटमधे काम करत असलेल्या व या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांमधे साक्षरता निर्माण करण्याचे काम केले आहे. चिन्मय रेमणे, शरद बोदगे, आदित्य गुंड व नचिकेत धारणकर ही या संस्थेशी संबंधीत नावे असून अर्थ विषयाशी संबंधित कंटेंट, मार्गदर्शन पुरविण्याचं काम ही संस्था करते. तर प्रविण पाटील हे 13 वर्षांपासून शेअर मार्केटमधे काम करत असून या क्षेत्रातील एक मोठं नाव आहेत. ते एक दिग्गज फुल टाईम ट्रेनर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाचा आजपर्यंत अनेकांना फायदा झाला आहे. एका मध्यमवर्गीय कुटूंबातून येऊन एक यशस्वी ट्रेडर होण्याचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
थोडक्यात बातम्या-
“निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”
“फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडा मारत होते?”
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
‘मग ते भोंगेही उतरवा तरच तुम्ही हिमतीचे’, शिवसेनेचं भाजपला खुलं आव्हान
Comments are closed.