गाडी घ्यायची असेल तर ‘या’ 7 सीटर गाड्यांचा नक्की विचार करा

नवी दिल्ली | नवीन वर्ष जवळ येत आहे. अशावेळी फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर ट्रिपला जाण्याचा आपला प्लॅन असतोच. पण फॅमिली मोठी असल्याने कार देखील मोठी प्रशस्त आणि पुरेपुर व्यवस्था असावी असा आपला मानस असतो. त्यावेळी एखादी मोठी कार आपल्याकडे असावी असं आपल्याला वाटतं मात्र ती बजेटमध्ये देखील मिळायला हवी असं देखील वाटतं. त्यामुळेच आता भारतात कमी बजेटमध्ये 7 सीटर कार येऊ लागल्या आहेत.

सगळ्यात पहिलं माॅडेल आहे ते म्हणजे मारुती सुझुकीची 7 सीटर कार EECO. सुझुकीच्या सेगमेंटमधली ही सगळ्याच स्वस्त कार आहे. जी प्रचंड लोकप्रिय आहे. नवीन मारुती Eeco 13 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.13 लाख रुपये इतकी आहे.

मारुती सुझुकी Eeco मध्ये, कंपनीने रिक्लिनिंग फ्रंट सीट, केबिन एअर फिल्टर, डोम लॅम्प आणि नवीन बॅटरी सेव्हिंग फंक्शन हे सगळे फिचर्स आहेत आणि सुरक्षिततेबद्दल बोलायचं झाल्यास हॅझार्ड लाइट्स, ड्युअल एअरबॅग्ज, इंजिन इमोबिलायझर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), चाइल्ड लॉक, स्लाइडिंग डोर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत.

दुसर माॅडेल आहे Renault Triber Renault Triber हा देखील तुमच्यासाठी उत्तम पर्यायांपैकी एक आहे. या दोन मल्पिर्पज कार दोन वेगवगळ्या इंजिनमध्ये आहे. याचे दोन वेरिएंट आहेत. एका वेरिएंटमध्ये 1 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 72PS चा पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, 1 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे, हे इंजिन 100PS ची पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टर्न इंडिकेटर, यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. किमतीबद्दल सांगायचं झाल्यास त्याची किंमत 5.92 लाख ते 8.51 लाख रुपये आहे.

तिसरा पर्याय तुमच्यासमोर आहे तो म्हणजे Maruti Ertiga. मारुती सुझुकी एर्टिगा एमपीव्ही सेगमेंटची लीडर असल्याचे म्हटले जाते, पेट्रोल इंजिनसह सीएनजी प्रकारात येणारी ही कार मोठ्या कुटुंबांसाठी अतिशय योग्य आणि परवडणारी कार आहे. किंमतीबद्दल सांगायचं झाल्यास याची किंमत 8.35 लाख ते 12.79 लाख रुपये आहे. कंपनीचा दाव्यानुसार पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 20 किलोमीटरची रेंज देईल आणि सीएनजी मोडमध्ये ही कार 26.11 प्रति किलो किमी पर्यंत मायलेज देते. बाकी सगळे भन्नाट फिचर्स देखील उपलब्ध आहेत.

या होत्या तीन मोठ्या त्यामुळे या वर्षी तुम्ही नवीन कार घ्यायचा विचार करतं असाल तर या तीन गांड्यांचा विचार करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More