बारामती | दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर शेतकऱ्यांना रस्त्यांवर उतरायला लावत अाहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत बारामतीतून त्याचं डिपाॅझिट जप्त करू, असं शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे म्हणाले.
मागील लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी राहिली, त्यांना मतदान केलं, असं ते म्हणाले.
दरम्यान, जानकरांनी आमची दोन-चार कामे केली आहेत, परंतु शेतकरी हा माझा केंद्रबिंदू आहे, ते शेतकऱ्यांना असे करायला लावत असतील तर त्यांची अनामतही ठेवणार नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!
-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव
-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार
-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण
-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी