“…तर मोदींना मारायला तयार राहा”
नवी दिल्ली | काॅंग्रेसचे(Congress) नेते राजा पटेरिया(Raja Pateriya) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल(Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्यं केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
पटेरिया एका सभेत बोलताना म्हणाले आहेत की, मोदी धर्म, जात, भाषा या आधारावर जनतेत फूट पाडतील. अल्पसंख्याक,दलित, आदिवासी यांचं पुढील जीवन धोक्यात आलं आहे. संविधान वाचवायचं असेल तर मोदींना मारायला तयार राहा.
पटेरिया यांच्या वक्तव्यानंतर भाजप(BJP) नेते संतप्त झाले आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तरम मिश्रा यांनी पटेरियांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
पटेरिया यांच्या या वक्तव्याला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चौहान म्हणाले आहेत की, भारत जोडा यात्रा करणारे देश तोडण्याची कामं करीत आहेत. असं वक्तव्य करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही,असा इशाराही यावेळी सिंह यांनी दिला.
पटेरिया यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले आहेत की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मांडण्यात आला आहे. मोदींना मारणे म्हणजे निवडणुकीत त्यांना हरवणं, असं मला म्हणायचं होतं.
दरम्यान, पवईत काॅंग्रेस नेत्यांना संबोधित करताना पटेरिया यांनी हे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य रेकाॅर्ड झालेला पटेरिया यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.