बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे विद्यापीठात फिरायला यायचं असेल तर यापुढे पैसे द्यावे लागणार!

पुणे | पुणे विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्यांना प्रति महिना 1 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी विद्यापीठानं एसपीपीयू ऑक्सी पार्क योजना आणली आहे. विद्यापीठाने या योजनेचं एक परिपत्रक जारी केलंय. त्यानंतर विद्यापीठावर टीका केली जात आहे.

विद्यापीठाला आर्थिक मदतीची गरज असल्यामुळे अशा प्रकारची योजना सुरु केल्याचं बोललं जात आहे. सकाळी किंवा संध्याकाळची वेळ घालवण्यासाठी पुणेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात येत असतात. यामुळे या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठाच्या ऑक्सी पार्क योजनेला 21 जून अर्थात योग दिनापासून सुरुवात केली जाणार आहे. मात्र विद्यापीठानं हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा विद्यार्थी संघटना आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या या निर्णयावर मनसे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरेंनी देखील फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठातील झाडं पहात, परिसराचा आनंद घेत फेरफटका मारायला आता पैसे पडणार हे पटत नाही. तिथला निसर्ग ही कुणाची खाजगी मालमत्ता आहे का?, असा सवाल शिदोरेंनी केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”

“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

“प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय”

“कोरोनातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही”

भाजपला मोठा धक्का; एका खासदारासह तीन आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत???

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More