बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची माहिती शेअर करत असाल तर सावधान, ‘या’ तरुणासारखं तुमच्यासोबतही घडू शकतं!

जोधपूर | भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. या कारणामुळे रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून अनेकांनी आपला जीव गमवला आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान मधील जोधपूर येथील एका तरुणाने कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती असलेली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मात्र ही पोस्ट करणं त्याला महागात पडलं आहे.

संबंधित आरोपीचं नाव पंडित अभिषेक जोशी असं आहे. अभिषेकने फेसबूक पेजवर जोधपूर येथील एमडीएम रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खोटी पोस्ट व्हायरल केली होती. या कारणामुळे महामंदिर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केल्यावर आरोपी अभिषेकने आपल्याला पश्चाताप होत असल्याचं म्हटलंय.

आरोपी अभिषेक या प्रकरणी माफीची मागणी करत असून आपण ही पोस्ट केली नाही. तर आपल्याला इतरांकडून ही पोस्ट आली असून ती पोस्ट आपण केवळ शेअर केली असल्याचं अभिषेकने म्हटलं आहे. पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, चुकीची माहिती असेल तर तुला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं देखील त्या पोस्टच्या कमेंटबॉक्समध्ये एका नेटकऱ्याने लिहिलं होतं. पोस्ट बाबत अनेक विचारणा केल्यानंतर अभिषेकने ती पोस्ट डिलीट केली. मात्र अफवा पसरवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ‘द फिशरमॅन्स डायरी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

पुण्यातील अलिशान हॉटेलमध्ये हायप्रोफाईल राडा, पतीनं पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं अन्…

‘हप्ते गृहमंत्र्यांना पोहोचवावे लागतात…’; सराफाने पोलीस निरीक्षकावर केलेल्या आरोपांनी खळबळ

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचं पालन अशक्य- अमित शहा

औरंगाबादेत PSI आणि महिला हवालदाराचं सूत जुळलं, पत्नीसोबत केलं लज्जास्पद कृत्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More