Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

गजा मारणेची आता खैर नाही, पोलिसांना आलेत ‘हे’ महत्त्वाचे आदेश!

पुणे | पप्पू गावडे आणि अमोल बधे या दुहेरी खून प्रकरणातून कुख्यात गुंंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तळोजा ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरून शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह गजानन मारणेची मिरवणूक काढून टोलनाक्यावर फटाके वाजवण्यात आली. या प्रकरणी तळेगाव व कोथरुड पोलिसात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आणि दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित प्रकरणात गजानन मारणेला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. पण, आता पोलिसांनी या प्रकरणाला जास्तच गंभीरपणे घेतल्याचं दिसून येत आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कडक कारवाई करून एक अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत, त्यामुळे गजानन मारणेच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे.

नुकताच जेलमधून सुटलेला कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा जेलवारी करण्याची बारी येऊ शकते. संबंधित प्रकरणात काही दिवसांपूर्वीच गाडी पुरवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यासह काही आलिशान गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. मात्र आता थेट पोलिस महासंचालकांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची दाट शक्यता आहे.

गजा मारणे व त्याच्या समर्थकांवर पिंपरी-चिंचवड, तळेगाव, खालापूर व कोथरूड या ठिकाणी एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गजा मारणे सध्या फरार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची स्वतंत्र पथके त्याचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या –

मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचली महिला, खरा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले

वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा

मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण

संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता

पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या