Top News राजकारण

असा गृहमंत्री मी याआधी कधीही पाहिला नाही; ममता बॅनर्जींची अमित शहांवर टीका

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येतातय. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय.

एका पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना त्यांनी टीका केलीये. यावेळी त्यांनी कोरोना लस आणि सुभाष चंद्र बोसांचा जुना मुद्दा उचलून धरला आहे.

“मी असा गृहमंत्री याआधी कधीच पाहिला नाहीये. एका गृहमंत्र्याने देश चालवायला हवा. परंतु, हे छोट्या-छोट्या निवडणुकांच्या व्यवस्थापनात व्यस्थ आहेत. लोकांच्या घरी जेवण घ्यायला जातात आणि तिथे फोटो काढतात,” अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी टीका केलीये.

त्या पुढे म्हणाल्या, “लशीच्या बाबतीत एवढ्या मोठ्या चर्चा आहेत. मात्र, लस कधी येणार, हे अजून कोणालाही माहिती नाहीये. तरीही गेल्या सहा महिन्यांपासून भाजप भाषण देण्यात व्यस्त आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या-

“नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात, पण तीच नवरी वर्षभराने घराची मालकीण होते”

“आडवंच करायचं असेल तर बोलायचं कशाला?, जे आहे ते करुन टाकावं”

राष्ट्रवादीची ‘ही’ पदाधिकारी अडचणीत; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पैसे लाटल्याचा आरोप

“आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात?”

“शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या