IIT Baba l चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील गट फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा (Pakistan) दणदणीत पराभव केला. भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्याची जेवढी चर्चा सोशल मीडियावर (Social Media) झाली, तेवढीच चर्चा ‘आयआयटी बाबा’ (IIT Baba) म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंहच्या (Abhay Singh) भविष्यवाणीचीही झाली.
‘आयआयटी बाबा’ चर्चेत :
महाकुंभ मेळ्यातील (Mahakumbh Mela) एका व्हिडिओमुळे ‘आयआयटी बाबा’ चर्चेत आला होता. भारत-पाकिस्तान सामन्यावरील भविष्यवाणी करणारा त्याचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव होणार, असे म्हटले होते. मात्र, सामन्यात भारताचा विजय झाला.
IIT Baba l चुकीच्या भविष्यवाणीनंतर माफी :
सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर, ‘आयआयटी बाबा’ने सोशल मीडियावर या चुकीच्या भविष्यवाणीसाठी माफी मागितली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे, ज्यात तो माफी मागताना दिसत आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “मी सार्वजनिकपणे माफी मागू इच्छितो. तुम्ही सर्वांनी आनंद साजरा करा. ही पार्टीची वेळ आहे… मला मनात माहीत होते की भारत जिंकेल.”
आधीच्या व्हिडिओत केला होता पराभवाचा दावा
याआधी त्याचा भारताच्या पराभवाची भविष्यवाणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. “या सामन्यात पाकिस्तान जिंकेल. विराट कोहली (Virat Kohli) आणि इतर खेळाडूंनी कितीही प्रयत्न केले, तरी भारत जिंकू शकणार नाही!” असा दावा त्याने केला होता. मात्र, भारताचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे.