भारत-पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार?; IIT बाबाची धक्कादायक भविष्यवाणी

India vs Pakistan

India vs Pakistan l सध्या सर्वत्र चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy) चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा (Bangladesh) 6 गडी राखून पराभव केला. आता 23 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना रंगणार आहे, ज्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच, महाकुंभमेळ्यात (Mahakumbh Mela) प्रसिद्धी मिळवलेल्या IIT बाबाने (IIT Baba) एक अनोखी भविष्यवाणी केली आहे, ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

IIT बाबाची वादग्रस्त भविष्यवाणी :

यावेळी मात्र, बाबांच्या भविष्यवाणीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. एका युट्यूब चॅनलला (YouTube channel) दिलेल्या मुलाखतीत IIT बाबा अभय सिंह (Abhay Singh) यांनी वादग्रस्त विधान केले.

ते म्हणाले, “यावेळी भारताचा पाकिस्तानसमोर टिकाव लागणार नाही. विराट कोहली (Virat Kohli) किंवा रोहित शर्माने (Rohit Sharma) कितीही प्रयत्न केले, तरी भारत ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकणार नाही. मी म्हणतोय, नाही जिंकणार तर नाही जिंकणार भारत हा सामना. देव मोठा आहे की तुम्ही? आता तुम्हाला काय करायचं ते करा, पण भारतासाठी हा सामना जिंकणं कठीण आहे. पाकिस्तान (Pakistan) भारताचा पराभव करेल.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ (ICC T-20 World Cup 2024) स्पर्धा मी जिंकून दिली होती, मी रोहितला सांगितलं होतं की कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. पण आता सगळं उलटं केलं आहे मी, यावेळी भारत हरणार.”

India vs Pakistan l व्हिडिओ व्हायरल, क्रिकेटप्रेमी संतप्त :

बाबांच्या या भविष्यवाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) वेगाने व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींनी यावर संताप व्यक्त केला आहे. आता ही भविष्यवाणी खरी ठरते की खोटी, हे 23 तारखेलाच कळेल. मात्र, भारतीय क्रिकेटप्रेमी उत्साहात असताना, IIT बाबांनी त्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचे काम केले आहे.

News Title: IIT Baba’s Shocking Prediction on India-Pakistan Match!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .