बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मुंबईत दिवसाला 10 हजार कोरोना रूग्ण आढळतील”

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. विशेषत: मुंबई पुण्यासारख्या शहारांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. अशात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीबाबत आयुक्तांनी माहिती दिली आहे.

मुंबईत दररोज 50 हजार कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. ज्यामध्ये जवळपास सात हजार नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत दररोज 60 हजार कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

चाचण्याची क्षमता वाढवली तर, मुंबईत दिवसाला नऊ ते दहा हजार रुग्ण वाढतील. त्यामुळे याचा ताण प्रशासनावर पडेल. मात्र दिवसाला 10 हजार नवे रुग्ण आढळले, तरी तो ताण मुंबई प्रशासन सहजपणे पेलू शकते, त्यासाठी रुग्णालये सज्ज करण्यात आली आहेत, असं चहल यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या मुंबईत तीन हजार बेड रिकामे असून येत्या काळात काही खाजगी रुग्णालयांकडून खाट्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत आणखी 7000 खाटा उपलब्ध होतीलस अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी ठरवून दिलेली यंत्रणा मोडीत काढू नये आणि चाचणीचा अहवाल घेऊन खाटासाठी धावपळ करू नये, असा सल्लाही देखील चहल यांनी यावेळी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

देवेंद्र फडणवीस- जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वाॅर; कारण ठरले अनिल देशमुख

‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कोरोना लसीबाबत चिंता वाढवणारी बातमी; जगभरातील तज्ज्ञांच्या सर्व्हेने एकच खळबळ

पुण्यात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना कोरोना लस, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी; व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More