बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक; पाहा व्हिडीओ

ठाणे | राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. राज्यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे सारख्या महानगरात दिवसेंदिवस फेरीवाल्यांचा विषय हा गंभीर होत आहे. मनसे सातत्याने अनिधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतीय. त्यातच आता काल ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर आता पुन्हा मनसे आक्रमक झालेली दिसत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कासारवडवली भागात गेल्या असताना त्यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा चाकू हल्ला केला. या घटनेत पिंपळे यांच्या हाताचे दोन बोटं कापले गेली आहेत. तर, त्यांच्या अंगरक्षकाचं सुद्धा एक बोट कापलं गेलं. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आता मनसे मैदानात उतरली आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मनसे तीव्र शब्दात घटनेचा निषेध केला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट मैदानात उतरून अनधिकृत फेरीवाल्यांचा समाचार घेतला. अनधिकृत फेरीवाल्यांच्या गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी मनसे नेते महेश कदम यांनी फेरीवाल्यांना दमदाटी केेली आणि रस्ता मोकळा केला.

दरम्यान, सहाय्यक आयुक्तांवर हल्ला झाल्याची ही संतापजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलं आहे. या हल्लेखोराचे नाव अमरजीत यादव असं आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीत सध्या अनधिकृत बांधकामासोबतच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या –

कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली; लसही परिणामकारक नाही!

मनसेने करून दाखवलं! आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फोडली दहीहंडी; पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राला दिलासा देणारं चित्र; 24 तासात ‘या’ 6 जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही!

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयावर जंयत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

राज्यात दोन दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा कोरोना रूग्णसंख्येत घट; वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More