बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी छोटा पैलवान आहे, तुम्ही मला इतका सोपा समजू नका”

इंदापूर | राष्ट्रवादीचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील नेहमीच एकमेकांवर आक्रमक टीका करताना दिसतात. अशातच दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरात राजकीय फटकेबाजी करत विरोधकांना निशाण्यावर घेतलं आहे.

मी छोटा पैलवान आहे. तुम्ही मात्र मला इतका सोपा समजू नका. प्रत्येक डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. ते मला सगळं चांगलंच जमतं. भलेभले डाव कसं उलथवून लावायचे हे मला माहितीये, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. बॉल टप्प्यात आला की मी, सिक्स लावणार, अस म्हणत त्यांनी विरोधकांना देखील इशारा दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, माझ्या रक्तातच काम असल्यामुळे मी खोटं-नाटं आणि लबाडीचा धंदा कधी करत नाही. ज्या इंदापूरकरांमुळे मला मंत्रिपदाची खुर्ची मिळाली, त्या इंदापूरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तयार आहे, असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकत असताना त्याजवळ असलेल्या चिंचेची तालीमीत मी जात होते. त्यावेळी मी छोटा पैलवान होतो. त्यावेळी मी पैलवानगी देखील केली होती, असं म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

सकाळी ‘हे’ 4 पदार्थ खा; वजनही कमी होईल आणि होतील फायदेच फायदे

पुण्यात मोठी दुर्घटना! निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 12 जण जखमी

“सेना-भाजपला स्पष्ट बहुमत होतं, तरीही शरद पवारांनी सरकार बनवलं, हा तर…”

“भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More