बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही’, किसींग सिनमुळे पारसचा वेब सिरीजला नकार

मुंबई | ‘बिग बाॅस’ फेम अभिनेता पारस छाब्राने ‘स्प्लीट्सविला’ या रियालीटी शोमधून अगदी कमी कालावधीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अशातच त्याने एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

आपल्याला ओटीटी प्लॅटफाॅर्मवर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑफर येत असून यामध्ये किसींग सिनचा देखील समावेश आहे. यावरुनच किसींग सिन करायला आपण एक अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही, असं त्याने म्हटलं आहे. तसेच याचकारणामुळे त्याने काम करण्यासाठी नकार दिला आहे.

एवढच नाही तर माझ्या काही मर्यादा असून मी जे काम करतो ते पाहण्यासाठी माझे कुटुंबीय देखील उत्सुक असतात, असं पारसने म्हटलं आहे. तुमचं कुटुंब वैचारिक दृष्ट्या कितीही पुढारलेलं असलं तरी आई-बाबांसमोर एखादा किसिंग सीन येताच आपण गोंधळतो, माझीही अशीच अवस्था होते, त्यामुळे यापुढे मी केवळ चांगल्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यानं मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

दरम्यान, मुलाखतीत रोल अगदी लहान असला तरी चालेल मात्र त्यामधून माझा अभिनय प्रेक्षकांना दिसावा हीच माझी अपेक्षा असल्याचं पारसने सांगितलं आहे. पारसनं आतापर्यंत ‘स्प्लिट्सविला’, ‘व्ही द सिरिअल’, ‘मुझसे शादी करोगे’, ‘लेडिज वर्सेस जेंटलमॅन’ यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात”

“कितीही बंदी घाला, मुले जन्माला घालण्यापासून कुणी रोखू शकणार नाही”

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More