बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे…’; त्या व्हायरल व्हिडीओवर बाबुल सुप्रियोंचं स्पष्टीकरण

कोलकत्ता | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकींच्या मतदानांचा पहिला टप्पा पार पडला आहे. यादरम्यान एका होळी समारंभात भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी एका भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. यासंदर्भात एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

रविवारी टाॅलीगंज येथे झालेल्या होळी समारंभात आपण कोणालाही कानाखाली लगावली नसल्याचं बाबुल सुप्रियो यांनी स्पष्ट केलं आहे. घटनेसंदर्भात आपलं स्पष्टीकरण देत असताना जर त्यांना काही तणाव असेल आणि त्यांनी कानाखाली लगावली तरी मोठा भाऊ म्हणून ती कानाखाली होत नसल्याच त्यांनी म्हटलं आहे.

रविवारी आयोजित करण्यात आलेल्या होळी समारंभात काही लोक दारु पिऊन उधटपणे वागत असल्यामुळे मोठा भाऊ म्हणून मी फक्त त्याला धक्का दिला असल्याचं सुप्रियो यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावर टीएमसीने देखील टीका केली होती. मात्र सुप्रियो यांनी त्यांना देखील उत्तर दिलं आहे. मला काय करायची गरज आहे हे मी टीएमसीकडून शिकण्याची गरज नाही, असं सुप्रियो म्हणालेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींमुळे तेथील राजकरण चांगलंच तापलं आहे. अशात होळी समारंभात सुप्रियो यांनी केलेल्या प्रकारामुळे विरोधी पक्षाला टीका करण्याची आयती संधी मिळाली होती.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन!

खळबळजनक! दिल्लीत भाजप नेत्याने गळफास घेत केली आत्महत्या

“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More