देश

“अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ‘पूर्ण न्याय’ नाही”

हैदराबाद |  अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ‘पूर्ण न्याय’ नाही, असं म्हणत मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायालयाने कलम 142 नुसार असलेले अधिकार वापरायला हवे होते. हा एक उत्तम ‘अपूर्ण न्याय’ आहे व सर्वात वाईट ‘पूर्ण अन्याय’ आहे, असं म्हणत ओवैसींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

मला माझी मशीद परत हवी असं ट्विट त्यांनी यापू्र्वी केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला असता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, अनेक दशकांपासून प्रलंबित अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यात वादग्रस्त जमीन हिंदूंना दिली गेली असून अयोध्या परिसरात 5 एकर जमीन मुस्लीम पक्षकारांना देण्यात आली आहे.

 

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या