राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई | राष्ट्रपती (President) रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपला असून देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर झालीये. यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपण या स्पर्धेत नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांनी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.
मी आता या स्पर्धेत नाही. तसेच मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत देखील नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, माध्यमांच्या माहितीनुसार गुलाम नबी आझाद यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती मिळवली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांमध्ये चर्चा होण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार आहेत. येत्या 15 जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच 22 विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील या निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाला फेऱ्या मारल्या नाहीत- रुपाली चाकणकर
राजकारण्यांना सर्वात मोठा झटका?, निवडणूक आयोग हा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद
…म्हणून मोदींच्या देहूतील सभेआधी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला पोलिसांची नोटीस
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपती होणार?
Comments are closed.