बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्धांगवायूचा झटका आला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – अमोल मिटकरी

अकोला | राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्षा महागायिका वैशाली माडे सोमवारी अकोला दौऱ्यावर होत्या. पक्षाच्या वतीने वैशाली माडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड गात असताना अमोल मिटकरी यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित असणाऱ्या काही जणांना झाली. त्यानंतर काही जणांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मिटकरी यांच्या प्रकृतीत झालेला बदल उपस्थितांच्या लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मिटकरी यांना आयकॉन रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आज त्यांनी ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईल, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही छक्कड गात होते. मिटकरींना लहानपणापासून भजन कीर्तन यात रस आहे. तर अकोल्यात शिवव्याख्याते म्हणून त्यांचा लौकिकही वाढली आहे. तर या भागात ते राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक देखील आहेत.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेत्यांनी केलं स्पष्ट

“मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘महाराष्ट्र सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलं’, आशिष शेलारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचं ‘हे’ प्रत्यूत्तर

मुंबई महापालिकेत ‘भाजप मनसेला टाळी’ देणार का? ; आशिष शेलार यांचं स्पष्ट उत्तर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More