बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी तुमच्यासाठी कपडे घालत नाही’, ट्रोलर्सवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई | सोशल मीडियावर कलाकार नेहमीच सक्रिय असलेले पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओही चाहत्यांची शेअर करत असतात. मात्र काही वेळेस त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बरेच कलाकार यावर सडेतोड उत्तर देत असतात. असंच काहीसं पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल मीरा सेठीसोबत घडलं आहे.

अभिनेत्री आणि माॅडेल मीरा सेठीनं लक्स स्टाइल अवॉर्ड या कार्यक्रमात तिनं डिझायनर हुसैन रेहरने डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता. तिनं परिधान केलेल्या या आऊटफिटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या ड्रेसमुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

मीरानं या ट्रोलिंग करणाऱ्या नेटकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पहायला मिळालं. घरी जा, मी तुमच्यासाठी असे कपडे घालत नाही. मी कोणासाठी नाही तर स्वत:च्या आनंदासाठी असे कपडे परिधान करते. तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे, असं म्हणतं मीरानं ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

दरम्यान, मीरानं महिलांवर होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगमुळे संताप व्यक्त केला आहे. ट्रोलर्स बऱ्याच वेळा अनेक महिलांच्या फोटोवर अश्लील कमेंट करतात आणि हे पाहणं मजेशीर असतं, असंही मीरानं म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Sethi (@mira.sethi)

थोडक्यात बातम्या – 

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा; वाचा सविस्तर वृत्त

“भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही”

“विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास मिळणं हे ‘भाग्य’ आहे”

“पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बदनामीचा कट रचतायेत”

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More