बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पाॅर्न पाहण्याच्या व्यसनामुळे मी उद्धवस्त झाले’; प्रसिद्ध राॅकस्टारचा धक्कादायक खुलासा

मुंबई | तरूण वर्गामध्ये पाॅर्न (Porn Addiction) पाहण्याचा मोह असतो. महाविद्यालयीन मुलं मुली तसेच महिलांमध्ये पाॅर्न सर्च करण्याचे प्रमाण जास्त असते, असं अहवालातून स्पष्ट झालं होतं. मात्र, सतत पाॅर्न पाहणे शारिरिक तसेच मानसिक तणावाचं कारण ठरू शकतं. अशातच प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि गीतकार बिली इलिश (Billie Eilish) यांनी पोर्नोग्राफीच्या व्यसनाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

मी वयाच्या 11व्या वर्षापासून पॉर्न पाहायचे. मात्र या व्यसनामुळे खासगी आयुष्यावर आणि रिलेशनशिप्सवर खूप वाईट परिणाम झाला, असं बिली एलिशने सांगितलं आहे. त्यामुळे मन बिघडलं आणि त्यांना भयानक स्वप्नं पडत असल्याचेही बिलीने  म्हटलं आहे. त्यामुळे तरूणांनी पोर्नोग्राफीचं व्यसन लावून घेऊ नये, असा सल्ला देखील बिली इलिशने दिला आहे.

बिली इलिश 19 वर्षांची आहे आणि बिली इलिशने ग्रॅमी पुरस्कार देखील जिंकला आहे. वयाच्या 11 व्या वर्षी पॉर्न पाहण्यास सुरुवात केली. सिरियस एक्सएम रेडिओवर प्रसारित होणाऱ्या हॉवर्ड स्टर्न शोमध्ये त्याने त्याच्या पॉर्नच्या व्यसनाबद्दल उघडपणे बोललं आहे.

दरम्यान, सतत पाॅर्न पाहिल्यामुळे तुमची सेक्सबद्दलची समज खूपच कमी होते आणि तुम्हाला जवळच्या क्षणांमध्ये सामान्य गोष्टी नीट समजत नाहीत, असंही बिली इलिशने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांची वाट लावली”

“आम्ही आहोत म्हणूनच राज्यात सत्ता”, अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

पेराल तेच उगवेल! “विराटने त्याच्यासोबत असंच केलं होतं”; कोहली सोशल मीडियावर ट्रोल

“राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता, पण…”

लिटल मास्टर म्हणतात, “नेमकं काय झालंय हे फक्त ‘तो’ व्यक्ती खरं सांगू शकतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More