बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी गुडघ्यावर बसण्यास तयार”, अखेर क्विंटन डिकाॅकची माघार

दुबई | युएईमध्ये  टी ट्वेंटी विश्वचषकाला धमाक्यात सुरूवात झाली आहे. जगातील अव्वल 12 संघामध्ये पहिल्या फेरीला रोमांचक पद्धतीनं सुरूवात झाली आहे. प्रत्येकी 6-6 संघाना अ आणि ब या दोन गटात विभागण्यात आलं आहे. विश्वचषकाच्या सुरूवातीच्या सामन्यातच दक्षिण आफ्रिका संघातील वाद चव्हाट्यावर आला होता. ब्लॅक लाईव्ज मॅटर प्रकरणी आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकाॅकनं आपण सतत गुडघ्यावर बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत वेस्ट इंडीज विरूद्धच्या सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. परिणामी त्याच्यावर आजिवन बंदीची शक्यता होती. पण आता क्विंटन डिकाॅकनं आपण याप्रकरणी जाहीर माफी मागत असल्याचं पत्र आफ्रिका क्रिकेट बोर्डाला पाठवलं आहे. म्हणून त्याच्यावर आफ्रिका क्रिकेट मंडळ कारवाई करणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

डिकाॅकनं आपल्या माफीनाम्यात आपल्या संघसहकाऱ्यांची आणि देशवासियांची माफी मागितली आहे. खेळाडूंनी गुडघे टेकल्यानं जागरूकता पसरत असेल आणि कृष्णवर्णियांचं आयुष्य अधिक चांगलं होत असेल तर त्यानं मला आनंदच होईल, असं डीकाॅक म्हणाला आहे. माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेट खेळण्यापेक्षा काही महत्त्वाचं नाही. मला देशासाठी क्रिकेट खेळत राहायचं आहे, असंही डिकाॅक म्हणाला आहे.

दरम्यान, डिकाॅकच्या न खेळण्याच्या घोषणेनंतर अवघ्या क्रिकेट विश्वास खळबळ माजली आहे. आता डीकाॅकच्या माफीनाम्यानंतर हे प्रकरण मिटण्याची शक्यता आहे. डिकाॅकच्या अचानक घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यानंतर जगभरातील दिग्गज खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या 

“भाजप आता गुन्हेगारांच्या जोरावर निवडणूक लढवणार का?”

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

“आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय”

गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More