बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला खूप भरुन येतंय भावांनो…’; किरण मानेंची भावूक पोस्ट व्हायरल

मुंबई | किरण माने प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. यामुळे याचे राजकीय पडसादही पहायला मिळाले.

किरण माने यांनी याप्रकरणी केलेली भावूक पोस्ट सध्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मला खूप भरुन येतंय भावांनो… आमच्या सिरीयलमधल्या ज्या-ज्या महिला माझ्या बाजूनं उभ्या राहिल्या, त्या अत्यंत उत्स्फूर्तपणे पुढे आल्या. त्या म्हणाल्या, “सर ! प्रामाणिकपणानं आणि सच्चाईनं वागून त्याचं फळ म्हणून आम्हाला कामावरून काढून टाकणार असतील, तर एखादं स्नॅक्स सेंटर काढू आणि आनंदानं चालवू…पण अन्याय आणि खोटं सहन नाही करू शकत”, असं किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, एवढ्या गदारोळात अनिता दाते-केळकर, प्राजक्ता केळकर, श्वेता आंबीकर, शितल गीते आणि गौरी सोनार यांनी जे सत्व आणि स्वत्व दाखवलं याला तोड नाही! जगात स्त्रीचा सन्मान केला जातो, तो अशाच नितळ-निर्मळ आणि पारदर्शी वृत्तीच्या भगिनींमुळेच.

दरम्यान, प्राॅडक्शन हाऊस नाराज होणं परवडणारं नसतं आपल्या क्षेत्रात. तुम्हाला खरा किरण माने माहिती असला तरी रिस्क असल्याचं किरण माने यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे का होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हावं”

“नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा”

‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो आणि मारुही शकतो’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानं खळबळ

पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कार खाली उडी घेत आत्महत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More