Top News महाराष्ट्र मुंबई

“अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच आता इतरांना शिकवत आहेत”

मुंबई | मी 6 वेळा जनतेतून निवडून आलोय. प्रसाद लाड यांनी एकदा तरी निवडून येऊन दाखवावं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना लगावला होता. यावर प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आजवरच्या राजकारणात भाजपा संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला, असं म्हणत प्रसाद लाड यांनी खडसेंवर निशाणा साधलाय.

पक्षाने एवढं दिलं, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत अशी टीका प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंवर केली.

स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे असा टोलाही आमदार प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा मेट्रो कारनामे”

“पिंजऱ्यात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना सर्टिफिकेट कसं देणार?”

‘बिहारच्या विकासाठी भाजप नत्यांनी एकत्र काम करावं, त्यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल’

“संजय राऊतांना आता कळलं असेल, राज ठाकरे मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले”

 

:

“संजय राऊत हे नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या