बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाबा रामदेव यांनी माफी मागितली नाही, तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू”

नवी दिल्ली | इंडियन मेडिकल असोसिएशन आणि बाबा रामदेव यांच्यात सुरू असलेला वाद आता आणखी पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथीवरून बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. कालच बाबा रामदेव यांनी 25 प्रश्नांची यादी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली होती.

काही आजारांवर ॲलोपॅथीमध्ये ठोस उपाय आहेत का? असं देखील त्यांनी विचारलं होतं. दरम्यान, आता रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत. आयएमएने बाबा रामदेव यांना 15 दिवसात माफी मागायला सांगितली आहे.

बाबा रामदेव यांनी 15 दिवसात माफी मागितली नाही तर, एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असं इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवून म्हटलं आहे. त्यामुळे आता बाबा रामदेव विरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन असा वाद चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देखील हस्तक्षेप केला होता पण आता इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या विरोधात कंबर कसली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात आता बाबा रामदेव माफी मागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

सर्कसमधील खेळ सुरू असताना अचानक सिंहाने ट्रेनरवरच केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

“जर पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यांवर जबाबादारी सोडणार की उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार?”

मास्टर प्लॅन! अमेरिकेत बसून भारतातील पत्नीची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

लक्षण कोणतीही असली तरी डॉक्टर सांगायचा कोरोना त्यानंतर…; ग्रामस्थांनी अशाप्रकारे फोडलं बिंग

चक्क मांजरानं केली ‘या’ प्राण्याची शिकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More