देशभरात वादळ-वाऱ्याचा तडाखा! 18 राज्यांमध्ये पावसाचा इशारा

IMD : Alert

IMD Alert l भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरातील 18 राज्यांमध्ये वादळ, वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. इराक आणि बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळांचा प्रभाव भारतातील अनेक भागांवर पडणार आहे. विशेषतः जम्मू-काश्मीर, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

इराक व बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळांचा प्रभाव :

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 16 मार्चपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा आहे. पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारतात प्रवेश करत असून, यामुळे दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. दुसरे चक्रीवादळ बांगलादेशातून येणार असून, पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 16 मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि वादळी पावसाचा इशारा आहे.

पंजाब आणि हरियाणा – 12 आणि 13 मार्चला मेघगर्जनेसह पाऊस
राजस्थान – 13 ते 16 मार्च दरम्यान वादळ आणि वादळी वाऱ्यासह पाऊस
बिहार आणि पश्चिम बंगाल – जोरदार पावसाची शक्यता
अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य राज्ये – मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा
दक्षिण भारत – तामिळनाडू, केरळ येथे अतिवृष्टीचा अंदाज

IMD Alert l 16 मार्चनंतर चक्रीवादळाचा धोका? :

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक भागांत पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टीवरील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, कारण वाऱ्याचा वेग ताशी 60 किमीपर्यंत जाऊ शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 16 मार्चनंतर चक्रीवादळाच्या तीव्रतेत घट होण्याची शक्यता आहे, मात्र काही भागांत पावसाचा मारा सुरूच राहू शकतो.

महाराष्ट्रात सध्या तापमान 36-37 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून, पुढील तीन-चार दिवसात तापमान 2-3 अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 ते 20 मार्चदरम्यान काही ठिकाणी पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

News Title: IMD Alert: Cyclone and Heavy Rain Warning in 18 Indian States

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .