सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट

IMD Monsoon Forecast 2025 l गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये वारंवार बदल होताना दिसत आहे. अशातच काही वर्षांनंतर जगभरात अल नीनो आणि ला नीनाचा परिणाम पाहायला मिळत असतो. तसेच हे चक्रीवादळ प्रशांत महासागराशी संबंधित असल्याचं दिसत आहे. मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होत आहे.

ला निना सक्रिय होण्याची शक्यता :

अशातच जागतिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतासह जगभरात वातावरण सामान्य पाहायला मिळत आहे. मात्र पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असल्याचं सांगितलं आहे. मात्र आता या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आहे.

तसेच ला निनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येत आहे. त्यामुळे आता ला नीना सक्रिय झाल्यास दक्षिण गोलार्धात उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तसेच त्याचा परिणाम उत्तर गोलार्धात होत असल्याने कडाक्याची थंडी पडत आहे.

IMD Monsoon Forecast 2025 l देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहणार? :

मात्र आता पुढील वर्षी जगासह भारतात ला निनाचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता जागतिक हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच आता देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता असून, काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात शेतीच नुकसान झालं होतं. दरम्यान या वर्षी जर ला निनाचा प्रभाव राहिला तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो.

News Title – IMD Monsoon Forecast 2025

महत्त्वाच्या बातम्या-

“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली, दिल्लीत उपचार सुरू

भुजबळ ते धनंजय मुंडे.., राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

सर्वाधिक मंत्रीपदे भाजपालाच, शिंदे-अजितदादांच्या वाट्याला किती खाती?; यादीच आली समोर

शाहरुख खानमुळे ‘पुष्पा’ एका दिवसात जेलमधून बाहेर; किंग खानने काय खेळी खेळली?