बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इम्तियाज जलील यांनी मराठा बांधवांना केली ‘ही’ विनंती; म्हणतात…

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिमांनी मराठा बांधवांना पाठींबा दिला होता. आता मराठा बांधवांनीही मुस्लिमांच्या आरक्षणसाठी पाठींबा द्यावा, अशी विनंती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

जेव्हा तुमच्या आरक्षणाचा मुद्दा आला होता तेव्हा आम्ही पूर्णपणे समर्थन केलं होतं. आता मराठा समाजाने मुस्लिमांच्या बाजू्ने उभं रहावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

आरक्षणासाठी मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा त्यामध्ये कित्येक मुस्लिम बांधवांनी स्टॉल लावून  समर्थन दर्शवलं होतं, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील मराठा समाजातील नेते असतील किंवा लोकसभेतील असतील त्यांनी देखील आता मुस्लिमांच्या बाजूने बोलावं, असं जलील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून मराठा आरक्षणाचे स्वागत- छगन भुजबळ

-“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन यशस्वी”

-केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण लागू झालं पाहिजे- हर्षवर्धन जाधव

-…म्हणून भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल!

-अजित पवारांची सावली असलेला ‘हा’ नेता राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More