बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! कोरोना झाल्यावर वर्षभर…; रिसर्चमधून दिलासादायक खुलासा

नवी दिल्ली |  देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनारूग्णांच्या आकडेवारीमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी पुर्वतयारी सर्व राज्य करत आहेत. अशातच एका रिसर्चमधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या शरीरात कोरोना लसीशिवायही एक वर्षापर्यंत अँटीबॉडी तयार होतात त्यामुळे त्या लोकांची प्रतिकारशक्ती व्हायरस विरोधात मोठ्या प्रमाणात वाढते. रॉकफेलर यूनिव्हर्सिटी आणि न्यूयॉर्कच्या वेइन कॉर्नेल मेडिसिनच्या टिमच्या रिसर्चनुसार बरे झाल्यावर लोकांच्या शरीरात अ‍ॅंटीबॉडी आणि इम्यून मेमरी साधारण 6 महिने ते 1 वर्षापर्यंत कायम राहू शकते.

कोरोनाच्या संक्रमणातून बरे झालेले लोक कोरोनाची लस घेतात त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती आश्चर्यकारकपणे वाढते. त्यामुळे कोरोनाच्या कितीही घातक व्हेरिएंटला हरवण्यात यश मिळू शकतं, असं रिसर्चमधून समोर आलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस मोफत देणार असल्याचं सांगितलं  आहे.

थोडक्यात बातम्या- 

“शिवसेना भवन आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार”

‘या’ गावातील लोक रोज रात्री होतात तुरुंगात बंदिस्त, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

दैव देतं पण कर्म नेतं! राणू मंडलला उद्धपटणा पडला महागात, आता अशा प्रकारे जगते जीवन

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा- दिग्विजय सिंह

वाह रे पठ्ठ्या! ‘या’ मराठमोळ्या मुलाने इन्स्टाग्रामवरील ती कमी दाखवली अन् कंपनीने दिले 22 लाख रुपये

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More