नवी दिल्ली | ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला विविध राजकीय पक्ष तसेच राजकारण्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, मात्र याच राजकारण्यांसदर्भात आंदोलनस्थळी असलेल्या शेतकऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बंद संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी ही बाब स्पष्ट केली.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला विविध १५ पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, डीएमके, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पक्ष अशा पक्षांचा समावेश आहे.
दरम्यान, भारत बंद दिवसभर असेल मात्र चक्का जाम दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, असं पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं. तसंच बंद शांततेत पाळला जावा, असं आवाहन देखील शेतकरी प्रतिनिधींनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी संतापले; “जबरदस्ती भारत बंद केला तर…”
“आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत”
कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठं वक्तव्य, म्हणाले…
…तर जेलमध्ये राहणं पसंत करेन- ममता बॅनर्जीं
“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”