बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

का वाढतोय कॅन्सरचा धोका?, अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | सध्या जगभरात कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. कॅन्सरच्या कारणांवर तसेच त्याच्या उपचारांवर जगभरात सध्या मोठं संशोधन केलं जात आहे. आता यंसदर्भातच एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. चांगला व्यायाम केल्याने कॅन्सरपासून दूर राहता येऊ शकतं असं या संशोधनातून पुढं आलं आहे.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, जर अमेरिकन लोक दर आठवड्याला किमान 5 तास मध्यम ते तीव्र पद्धतीच्या शारीरिक हालचाली करत असतील तर सरासरी 46 हजारांहून अधिक लोकांना कर्करोगापासून दरवर्षी वाचवता येऊ शकतं. याआधीही अशा प्रकारची संशोधनं झाली आहेत, मात्र तरी हे संशोधन महत्त्वाचं मानलं जात आहे.

जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनाच्या आकडेवारीनुसार, 2013 ते 2016 दरम्यान 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव असल्याचं दिसून आलं आहे. मात्र हे प्रमाण पुरुषांच्या (14,277 प्रकरणे) तुलनेत महिलांमध्ये (32,089 प्रकरणे) जास्त आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, हे पहिले संशोधन आहे ज्यात कॅन्सरला शारीरिक हालचालींच्या अभावाशी जोडले गेलं आहे.

आपली जीवनशैली कशी आहे?, यावरुन आपलं स्वास्थ्य ठरत असतं. अनियमित आहार, जंकफूड खाणं, पुरेशी झोप न घेणं, व्यायाम न करणं, शारिरीक हालचाली सुद्धा जास्त न करणं ही अत्यंत घातक जीवनशैली आहे. यामुळे लठ्ठपणा तसेच मधुमेहासारख्या गंभीर आजारांना तर निमंत्रण मिळतंच, शिवाय कॅन्सरसारखे जीवघेणे आजार देखील बळावू शकतात. त्यामुळे चांगला व्यायाम तसेच पुरेशा शारिरीक हालचाली करुन कॅन्सरपासून दूर राहता येऊ शकतं.

थोडक्यात बातम्या-

अखेर काँग्रेसचा अध्यक्ष ठरला, कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजली”

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

‘तालुक्यात विकास केल्यामुळं मला शांत झोप लागते’; भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

जर कोणी धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी…- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More