मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल

Share Market | सध्या देशात लोकसभेची निवडणूक चालू आहे. देशात निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. या निवडणुकीचा परिणाम शेअर बाजारावरही (Share Market) पाहायला मिळतोय. गुंंतवणूकदार देखील शेअर बाजारावर (Share Market) लक्ष ठेवून आहेत. अशात सरकार कोणाचं येणार यावर देखील शेअर बाजाराच्या हलचाली अवलंबून असल्याचं बोललं जात आहे.

निवडणुकीचा येत्या 4 जून रोजी निकाल लागणार आहे. या निकालावर शेअर बाजाराची स्थिती अवलंबून असणार आहे. मात्र निकालाआधी गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर मार्केटबद्दल केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं. 4 जून 2024 नंतर शेअर बाजार तेजीत राहणार असल्याचं अमित शहा म्हणाले.

“4 जूननंतर मार्केटमध्ये तेजी येणार”

शेअर बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील शेअर मार्केट 16 वेळा घसरला आहे. त्यामुळं याचा निवडणुकीशी संबंध जोडू नये असे अमित शाह म्हणाले. हे सगळे अफवांमुळं घडत आहे. 4 जूननंतर शेअर मार्केटमध्ये (Share Market) चांगली तेजी दिसून येईल, असं शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा सत्तेत आल्यास रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्च, डिफेन्स, इलेक्ट्रिकसिटी, पब्लिक सेक्‍टर्स (पीएसयू) आदी क्षेत्रात मोठी तेजी येऊ शकते. या कंपन्यांत पैसे लावलेल्यांना चांगले रिटर्न्स मिळू शकतील.

Share Market | मोदी सरकार आल्यास या कंपन्यांना फायदा होणार?

प्रभुदास लीलाधर (Prabhudas Lilladher) ने इंडिया स्ट्रॅटजी रिपोर्ट – मॅन्डेट 2024 ब्रेस फॉर व्होलॅटिलिटी नावाने हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यास इन्फ्रास्टक्चर, डिफेन्स, कॅपिटल गुड्स, न्यू एनर्जी, पर्यटन यासारख्या क्षेत्रातील शेअर्स चांगली कामगिरी करतील. कन्झ्यूमर, टू-व्हीलर्स, ट्रॅक्टर्स कंपन्यांदेखील चांगली कामगिरी करू शकतात.

दरम्यान, येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालावर शेअर बाजाराची (Share Market) स्थिती अवलंबून असणार आहे. या दिवशी अनेकांने पैसे बुडू शकतात तर अनेकांना या दिवशी मोठा फायदा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत

‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा

‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं

जान्हवी कपूरने सांगितली धक्कादायक घटना; संपूर्ण बॉलिवूड हादरलं