मुंबई | सत्तांतर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. समोरच्या पक्षाला बोलण्याची एकही संधी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष सोडत नाही. सध्या मविआ विरुद्ध भाजप (BJP) हा वाद पाहायला मिळत आहे. अशावेळी मुख्यमंत्री यांनी चक्क पवारांचं कौतुक केलं आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टि्ट्यूच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली आहे. यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मुख्यमंत्री शिंदें त्या सभेला उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच पवारांचं कौतुक केलं.
“ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार” असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला. यावेळी शिंदेंनी आपण केलेल्या कामांचा आढावा देखील वाचून दाखवला. यासाठी केंद्राची देखील आपण भेट घेतल्याचं ते म्हणाले.
केंद्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करत आहे. कृषीक्षेत्रात शरद पवारांचं योगदान मोठं आहे. त्यांना कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता असून गाढा अभ्यास देखील आहे. शरद पवारांनी नेहमी मार्गदर्शन (Guidance) करावं. त्याचा सहकार क्षेत्राला फायदा होईल. असं शिंदे भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar),राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांसाठी त्याच्या पुढील योजना काय असतील हे देखील शरद पवारांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या