Top News देश

रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!

नवी दिल्ली | प्रत्येक राज्यात खासगी वाहन प्रशिक्षण केंद्र आहेत. या केंद्रांकडून चालकाला सर्वप्रथम 21 दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर चालकाला आरटीओमध्ये जाऊन प्रशिक्षण प्रमाणपत्रासोबत कागदपत्रं जमा करावी लागतात. त्यानंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेऊन नंतर त्याला शिकाऊ वाहन परवाना दिला जातो.

मात्र आता प्रशिक्षित चालकाला विनाचाचणी वाहन परवाना मिळण्याचा निर्णय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक मंत्रालयाने नव्याने प्रशिक्षण केंद्रांसाठी मसुदा आधिसूचना जारी केली आहे. पण जर कोणत्या राज्याला यात काही बदल हवे असल्यास 30 दिवसांच्या आत सूचना सादर करावी, म्हणजे राज्यशासन याबाबत निर्णय घईल, असा आदेश देण्यात आला आहे.

नव्याने स्थापन करण्यात येणारी वाहन प्रशिक्षण केंद्रं ही 1 किंवा 2 एकरच्या मैदानी परिसरात असली पाहिजेत, या केंद्रात सर्वात महत्वाचे वाहतूक नियम शकवण्याची साधनं असणं आवश्यक आहे. तसेच हलकी वाहने,आभासी प्रशिक्षण चाचणी यंत्राणा, संगणक, मिल्टिमीडिया प्रोजेक्टर, अवजड आणि स्वतंत्र चाचणी पथ, पार्किंग व्यवस्था अशा अनेक सुविधा केंद्राच्या अधिसूचनेनुसार असणं गरजेचे आहे.

दरम्यान, या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षित चालकाला लगेच वाहन परवाना मिळेल आणि पुन्हा त्या केंद्रात किंवा आरटीओमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?

प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली

पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग… लगीन देवाचं लागतं… पाहा व्हिडीओ

टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!

भारतीयांना जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर दिवस-रात्र क्रिकेट सामना पाहण्याची संधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या