Top News महाराष्ट्र मुंबई

रेल्वे आणि लोकल पाठोपाठ एसटी देखील बंद राहणार?

मुंबई |  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकल, रेल्वेपाठोपाठ आता एस.टी देखील बंद ठेवण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधिन असल्याची माहिती कळतीये. शहराकडची अनेक लोकं आपापल्या गावाकडे जात असताना गर्दी होत आहे. त्यामुळे संसर्ग अधिक वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर एस.टी. बंद करण्याचा निर्णय शासन घेणार आहे.

आज रात्रीपासून 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील बससेवा बंद राहणार असल्याचा निर्णय शासन घेऊ शकतं, अशी माहिती कळतीये. झी 24 तास या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दुसरीकडे देशभरातील रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. प्रवासी गाड्या अजिबातच धावणार नाही. फक्त मालगाड्या सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबईतली लोकलसेवा देखील 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज हा आकडा वाढून 74 वर पोहचला आहे. त्यामुळे शासन वारंवार नागरिकांना घराबाहेर पडू नका, असं आवाहन करत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

जनता कर्फ्यू दिवशी घरी बसून करा ‘हे’ काम; रामदेव बाबांचा भन्नाट सल्ला

एक विषाणू देवावर आणि धर्मावर भारी पडला; संजय राऊत यांचा प्रबोधनात्मक अग्रलेख

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस खासदाराचा मोदींच्या जनता कर्फ्यूला पाठींबा; म्हणाले…

जनता कर्फ्यूबाबत रितेश-जेनेलियानं भारतीयांना केली विनंती; पाहा व्हिडीओ

“मोदींनी केलेल्या आवाहनाची खिल्ली उडवू नका… माझे कुटुंब देखील कॉरन्टाईन”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या