Top News महाराष्ट्र सातारा

‘मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत…’; उदयनराजेंनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरण खंडपीठाकडे पाठवून सध्या लागू असलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजासाठी विशेष योजना लागू करा, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. स्थगिती मिळाल्यावर उदयनराजे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हतं. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे, असं उदयनराजेंनी म्हटलं होतं.

दरम्यान, मराठा आंदोलनाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने न घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये, अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही”

कार्यालयातील 6 जणांना कोरोनाची लागण, छगन भुजबळ होम क्वारंटाईन

“शिवसेना बदललेली नाही, आजही गुंडा पार्टीच आहे”

‘मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो….’; नाथाभाऊंनी केला मोठा गौप्यस्फोट

“…म्हणून कंगणा राणावतला Y+ सुरक्षा दिली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या