Top News देश

देशातील ‘या’ नऊ राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी

नवी दिल्ली | देशातील नऊ राज्यांनी आत्तापर्यंत ‘एक देश एक रेशन कार्ड’ ही योजना चालू केली आहे. या अंमलबजावणी संदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक प्रेस रिलीज जाहीर करून याची माहिती दिली आहे.

आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या नऊ राज्यांनी एक देश एक रेशन कार्ड व्यवस्था लागू केली आहे या योजनेचा स्थलांतरित मजूरांना देशातील कोणत्याही भागात धान्य उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारने या योजनेसाठी 23,523 कोटी रूपयांच्या अतिरिक्त फंडला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या अतिरिक्त फंडचा वापर करण्यासाठी आवश्यक तयारी या राज्यांनी केली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग हा नोडल एजन्सी म्हणून कार्य करणार आहे.

दरम्यान, जर इतर राज्यांना या अतिरिक्त फंडचा लाभ घ्यायचा असेल तर 3 डिसेंबरपर्यंत ही सुधारणा लागू करणं आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील या नऊ राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक

“पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाचं महत्व काय समजणार?”

‘रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’; बच्चू कडू भडकले

कोरोना लसीबाबत जो बायडन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या