बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ …तर CT-SCAN करू नका’, एम्सच्या संचालकांनी दिला महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोनाव्हायरसचं आरटी-पीसीआर टेस्टमध्येही निदान न झाल्याची काही प्रकरणं दिसून आली. मात्र सिटी स्कॅनमध्ये अशा रुग्णांना कोरोना असल्याचं निदान होत आहे. त्यानंतर अनेक जण सीटी स्कॅन करून घेत आहेत. पण सिटी स्कॅन करणं महागात पडू शकतं, असा इशारा एम्सच्या डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये CT-SCAN करू नका. सिटी स्कॅन विचारपूर्वक करायला हवं, असं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. ते सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सौम्य लक्षणं असलेले रुग्ण कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात, असं ते म्हणाले.

सीटी स्कॅन हे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे. हे अत्यंत हानिकारक आहे. घरातील विलगीकरणात राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय.

जास्त बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय ही राज्ये बाधित आहेत, अशी माहिती गुलेरिया यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

नवरा-बायकोनं केक कापला, पुढं पोलीस आले अन् जेलमध्ये टाकलं, कारण धक्कादायक

कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोदींनी केली मोठी घोषणा!

पब्लिसिटीसाठीच काम करेन असं वागणं बरं नव्हं- नवाब मलिक

मन हेलावून टाकणारा फोटो; कोरोना मुक्त झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी

‘पराभूत झालो तरी…’; पराभवानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More