बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर बाहेर पडा पण…’; आरोग्य मंत्रालयाने दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण केलं जात आहे. केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यासाठी मान्यता दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. लसीकरणही वेगात होत आहे. सध्या बहुतेकांचं लसीकरण झालं आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर आपल्याला कोरोना होणार तर नाही ना?, आपण बाहेर गर्दीत जाऊ शकतो का?, असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. यावर आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. वयस्कर व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ते बाहेर फेरफटका मारू शकतात पण गर्दीत जाऊ शकत नाही, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं आहे.

जर संबंधित व्यक्तिला कोणता त्रास तर नाही ना?,  हे त्या व्यक्तिच्या आरोग्यावर अवलंबून असल्याचं व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. राज्यातील 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. 21 जूनपासून 18 वर्षाच्या वरील नागरिकांना सरसकट लसीकरण केलं जाणार आहे.

दरम्यान, कोरोनाची लाट जरी ओसरत असल्याचं दिसत असलं तरी कोरोनाचा धोका अद्यापही पुर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत कोरोना विषाणूपासून आपलं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं.

थोडक्यात बातम्या- 

भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, नार्वेकर म्हणाले, ‘यांना गाडीत टाका शिवबंधंन बांधू’

पैज लावून सांगतो देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही- राकेश झुनझुनवाला

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

‘कॉलेज आणि विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे फलक लावावेत’; युजीसीकडून विद्यापीठांना निर्देश

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More