तंत्रज्ञान

…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं

मुंबई | सध्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनेक चाहते आहेत. अनेकजण टिव्ही पाहण्यापेक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मना जास्त पसंती देतात. परंतु नेटफ्लिक्स सध्या एक मोठा बदल करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या युझर्सकडे नेटफ्लिक्स आहे पण त्यांनी त्याचा वापर केला नाही अशा युझर्सना नेटफ्लिक्स एक नोटिफिकेशन पाठवून प्लॅनच्या बाबतीत विचारणा करणार आहे. जर युझरनं या नोटिफिकेशनला उत्तर दिलं नाही तर त्याचा अकाऊंड सस्पेंड करण्यात येणार आहे.

अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर युझरला पुन्हा नेटफ्लिक्स वापरायचं असेल तर त्यांना पुन्हा नेटफ्लिक्सचा एखादा प्लॅन घ्यावा लागणार आहे. नेटफ्लिक्सनं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

ज्या युझर्सनं नेटफ्लिक्सवर गेल्या एक वर्षभरापासून काही पाहिलं नाही त्यांना आम्ही याबाबत विचारणा करत आहोत. तसंच युझर्सना आपली मेंबरशिप पुढे सुरू ठेवायची आहे की नाही याबाबतही माहिती द्यावी लागणार आहे. ग्राहकांची संख्या कमी होणं ही काही नेटफ्लिक्ससाठी मोठी बाब ठरणार नाही. इनअॅक्टिव्ह अकाऊंट हे त्यांच्या युझरबेसच्या एक टक्क्यापेक्षाही कमी असतील, असं नेटफ्लिक्सचे प्रोडक्ट इनोव्हेशन हेड एडी वू यांनी सांगितलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

महत्वाच्या बातम्या-

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

हा शिवसेना नेता राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकाल तर….; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या