इस्लामाबाद | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्ताव पास होण्याच्या पार्श्वभूमीवर काही अटी सर्वांसमोर ठेवल्या. इम्रान यांच्या गटाचे काही खासदार विरोधात गेल्यानंतर इम्रान यांना आता आपलं बहुमत राखता आलं नाही. अशातच इम्रान खान यांनी विरोधकांना पेचात टाकलं आहे.
इम्रान खान यांनी विरोधकांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना किंवा त्यांच्या मंत्र्याला अटक करण्यात येऊ नये, अशी अट इम्रान खान यांनी ठेवली आहे. इम्रान यांनी त्यांना एनबीए अंतर्गत अटक करण्यात येऊ नये, अशीही अट ठेवली आहे.
विरोधी पक्षातील पंतप्रधान पदाचे आघाडीचे नेते शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान करण्यात येऊ नये, अशी अट देखील इम्रान खान यांनी घातली आहे. इम्रान यांच्यानंतर पंतप्रधान बनण्यात सर्वात आघाडीवर शाहबाज शरीफ हेच आहेत. परिणामी पाकिस्तानातील राजकारण दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधील सत्ताबदलाला विदेशातून हवा मिळत असल्या चं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं होतं. त्यांनी अमेरिकेवर सत्ता बदलाबाबत आरोप केले होते.
थोडक्यात बातम्या –
अमेरिकेचा यु-टर्न, भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेनं केलं मोठं वक्तव्य
कोल्हापूरचा गडी सगळ्यावर भारी! पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी
“सुरक्षेत चुक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार”
“शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या म्हणून…”
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी
Comments are closed.